Latest News

Showing posts with label Main. Show all posts
Showing posts with label Main. Show all posts

Saturday, May 28, 2016

पशुपालन

गरीब, गरजू व अडाणी शेतकरी, शेतमजूर ह्यांच्याकडे एखाददुसरी गायम्हैस, २-३ शेळ्या, ४-५ कोंबड्या असतातच. मग ह्या असलेल्याच पशुधनाकडे थोडे लक्ष दिले, त्यांचे थोडे व्यवस्थापन केले तर हेच पशुधन घरासाठी कसा आर्थिक हातभार देऊ शकते, हे ह्या पदवी अभ्यासक्रमात शिकायला मिळते. पशुपालनामध्ये दुग्धोत्पादनाबरोबरच मांसासाठी शेळीपालन, कोंबडीपालन, बटेरपालन, ससेपालन ह्या पर्यायांवरही भर देण्यात आला आहे व मुख्य म्हणजे हे सहज व सोपेही आहे, हे दाखवून देण्याचा प्रयास आहे.
ग्रामीण भागातील लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडेच असलेल्या उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे, कमी पैशांमध्ये व कमी खर्चात पशुपालन कसे करायचे हे अनिरुध्दबापूंनी आखून दिलेल्या ह्या अभ्यासक्रमात आपल्याला शिकायला मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षित अथवा अशिक्षित शेतकरी सहजरित्या पशुपालनाकडे आकृष्ट होऊ शकतो व त्याच्या आधारे आपली परिस्थिती सुधारू शकतो.

Monday, March 28, 2016

सेंद्रीय शेती

शेती करण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीचा त्याग करून कल्पकतेने शेती करण्यासाठी तसेच शेतीचा उत्पादनखर्च कमी करून उत्पादनात वाढ करण्याची व शेतीपूरक व्यवसाय हाती घेण्याची गरज आहे. ह्यावरील उपाय म्हणून कमी खर्चाची, बिनकर्जाची, विषमुक्त, आरोग्यदायी उत्पादन देणारी, जमिनीची सुपिकता वाढवणारी सेंन्द्रिय शेती करणे जास्त फायदेशीर आहे.

ह्याकरीता अनिरुद्धबापूंनी ग्रामविकासाचा मंत्र दिला व काळाची पावले ओळखून ’अनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्यूट ऑफ ग्रामीण विकास’ हया संस्थेमध्ये सेंद्रिय शेतीचा पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरु केला.


सेंद्रिय शेतीच्या अज्ञानामुळे तसेच सेंद्रिय शेतीपद्धत राबवल्यामुळे येणारे उत्पन्न कमी मिळेल ह्या भीतीपोटी शेतकर्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीपद्धत व्यवस्थीत समजावून घेतल्यास शेतकर्‍यांना एक नवीन दिशा मिळू शकते.

ग्रामीण भागातील लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडेच असलेल्या उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे, कमी पैशांमध्ये व कमी खर्चात सेंद्रिय शेती कशी करायची हे अनिरुद्धबापूंनी आखून दिलेल्या ह्या अभ्यासक्रमात आपल्याला शिकायला मिळते. ह्याचे सर्वांत उत्तम उदहरण म्हणजे बापूंच्या संकल्पनेतील परसबाग. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षित अथवा अशिक्षित शेतकरी सहजरित्या सेंद्रिय शेतीकडे आकृष्ट होऊ शकतो व त्याच्या आधारे आपली परिस्थिती सुधारु शकतो.

How to do Videos


फोटोगॅलरी